फोनपे गुगलपे व पेटीएमने किती पैसे करु शकता ट्रांसफर? आरबीआय चे नवीन नियम

UPI Payment : प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असल्याने ऑनलाइन पेमेंटचे प्रमाण देखील वाढले आहे. खासकरून यूपीआयवर आधारित अ‍ॅप GPay, Amazon Pay, PayTm आणि Phone Pe चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु, या अ‍ॅप्सवरून तुम्ही दिवसाला ठराविक रक्कमेचेच व्यवहार करू शकता. NPCI ने यावरून पेमेंटसाठी मर्यादा घातली आहे.आता प्रत्येक जण ऑनलाईन पेमेंटलाच प्राध्यान देत असल्याचे दिसून येत आहे. सध्या डिजिटलायझेश अशा टप्प्यावर आहे की, लोकांकडे रोखची कमतरता आहे. तर, दुसरीकडे ऑनलाइन पेमेंट Apps मध्ये भरपूर पैसे आहे.

अगदी कॅब बुक करण्यापासून ते ऑनलाईन शॉपिंग पर्यंत, इतकंच काय तर टपरीवरील चहापासून फाईव्ह स्टार हॉटेलचे बिल देण्यापर्यंत लोक ऑनलाइन Payment Apps चा अवलंब करत आहेत. बहुतेक लोक Google Pay, Amazon Pay, PayTm आणि Phone Pe सारख्या अॅप्सद्वारे ऑनलाइन पेमेंट करण्यास प्राधान्य देतात. या अॅप्समुळे जास्त रोख ठेवण्याची गरज भासत नाही. तुम्ही देखील UPI वापरत असाल तर, ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. Amazon Pay, PayTm आणि Phone Pe सारख्या अॅप्सच्या मदतीने दिवभरात किती ट्रान्झॅक्शन करता येतं ते जाणून घेऊया.

  • आपल्याकडे UPIचा वापर खूप जास्त वाढला आहे. लहानांपासून ते अगदी मोठ्या पेमेंटसाठी लोक UPI चा वापर करतात.
  • UPI मुळे कधीही आणि कुठूनही पैसे पाठवणं सोप्पं होतं, शिवाय हिशोब ठेवणं देखील सोप्पं होतं. पण अनेकांना असा प्रश्न पडतो की, ते दिवसाला किती पैसे पाठवू शकतात किंवा UPI ने पेमेंट करु शकतात?
  • नॅशनल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडियाने UPI द्वारे माहिती देण्यात आली आहे की, तुम्ही UPIने एका दिवसात जास्तीत जास्त एक लाख रुपये ट्रांसफर करु शकता. ही तुमची जास्तीची लिमिट आहे. ज्यामुळे यापेक्षा जास्त पैसे तुम्ही कोणालाही पाठवू शकत नाही.
  • तुम्ही वेगवेगळं पेमेंट केलं तरी देखील त्याची बेरीज दिवसाला एका लाखापेक्षा वर जाऊ नये.
  • असं असलं तरी देखील अनेक ऍप्सने आपली-आपली ट्रॅझॅक्शन लिमिट सेट केली आहे. ज्यामध्ये पेटीएम एका तासात 20 हजार रुपये ट्रांसफर करण्याची अनुमती देते.
  • तेच फोन पे या ऍप्सबद्दल बोलायचं झालं तर युजर्स दिवसभरातून कधीही 1 लाख रुपये पाठवू शकतात.
  • ऍमेझॉन आणि गुगुल पे वरुन देखील तुम्ही 1 लाखापेक्षा जास्त रक्कम तुम्ही पाठवू शकत नाही, शिवाय तुम्ही दिवसभरात ती कधीही पाठवू शकता.

 

👉 RBI ची संपूर्ण नियम पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

Leave a Comment