तलाठी भरती परीक्षा दरम्यान मोठी बातमी

Talathi Bharti : तलाठी भरती परीक्षेत सुरू असलेला गोंधळ आणि यावरून विद्यार्थी आक्रमक झाल्याने परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्र परिसरात प्रशासनाने कलम १४४ लागू केले आहे. परीक्षा केंद्राच्या परिसर व सभोवतालच्या १०० मीटर परिसरात हे कलम लागू राहील. यानुसार सार्वजनिक टेलीफोन, एसटीडी, आयएसडी, बुथ, फॅक्स केंद्रे, झेरॉक्स सेंटर्स, ई-मेल इंटरनेट सुविधा, लॅपटॉप, मोबाईल, प्रसारमाध्यमे अथवा तत्सम संपर्क साधने बंद ठेवण्यात येणार आहे. उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता परीक्षा द्याव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यातील परीक्षा केंद्राच्या परीसरात व त्यासभोवतालच्या १०० मीटर परिसरात परीक्षेशी संबंधित असलेल्या अधिकारी, कर्मचारी वगळून इतर कोणत्याही व्यक्तींना परीक्षा केंद्रावर प्रवेश करण्यास मनाई असेल. तसेच परीक्षा केंद्राचे परीसरात दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई राहील. हा आदेश संबंधीत केंद्रावर परीक्षेस बसलेले परीक्षार्थी, परीक्षेसाठी नेमलेले अधिकारी/कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी/सुरक्षा अधिकारी यांना लागू होणार नाही.

परीक्षा केंद्रांवर मोबाईल, वायरलेससेट, ट्रॉझिस्टर, रेडिओ, कॅलक्युलेटर, लॅपटॉप व तत्सम इतर साधने जवळ बाळगण्यास व परिसराच्या १०० मीटर सभोवतालच्या परिसरात वापरण्यास मनाई आहे. सदर आदेशाचे कोणत्याही व्यक्तीने उल्लघंन केल्यास कारवाई करण्यात येईल.गट-क संवर्गातील तलाठी भरतीसाठी १४ सप्टेंबरच्या रात्री ८ वाजेपर्यंत निर्बंध लावण्यात आले आहेत. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी केले आहे

Leave a Comment