Ration Card News

अर्ज कसा करायचा?

  1. जर अंत्योदय कार्डधारकांकडे आयुष्मान कार्ड नसेल तर तुम्ही संबंधित विभागात जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
  2. पात्र लाभार्थ्यांना कार्ड मिळाल्यानंतर जनसेवा केंद्र, सामुदायिक आरोग्य केंद्र, आयुष्मान पॅनेलशी जोडलेले खाजगी रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात अंत्योदय शिधापत्रिका दाखवून कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी आयुष्मान कार्ड बनवता येईल.
  3. सध्या सरकारकडून नवीन आयुष्मान कार्ड बनवले जात नसून ज्या लाभार्थ्यांची नावे या योजनेत आधीच समाविष्ट आहेत, त्यांचीच कार्ड बनवली जात आहेत.
  4. अंत्योदय कार्डधारकांना आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यास उपचारासाठी भटकावे लागू नये, अशी शासनाचे प्रयत्न आहेत.
  5. यासाठी शासन स्तरावरून देखल जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

 

अंत्योदय कार्ड कोणाला मिळते?

  1. दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबांना अंत्योदय शिधापत्रिका (रेशन कार्ड) दिले जाते.
  2. या कार्डद्वारे लाभार्थ्याला दर महिन्याला स्वस्त दरात खाद्यपदार्थाचा लाभ मिळतो.
  3. कार्डधारकांना एकूण ३५ किलो गहू व तांदूळ दिले जाते.
  4. यासाठी गहू २ रुपये प्रति किलो तर तांदूळ ३ रुपये किलो मोजावे लागतात.