मतदार यादी पाहण्यासाठी सगळ्यांत आधी तुम्हाला ceo.maharashtra.gov.in हा पत्ता टाईप करावा लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर मुख्य निवडणूक अधिकारी ही वेबसाईट ओपन होईल.
या वेबसाईटवरील उजवीकडच्या Voter Service मधील Electoral Roll 2023 PDF या पर्यायावर क्लिक केलं की एक नवीन पेज ओपन होईल.
त्यानंतर यादी पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा जिल्हा, विधानसभा मतदारसंघ आणि गावाचं नाव निवडायचं आहे.
आणि मग कॅप्चा टाकायचा आहे. म्हणजे काय तर समोरच्या रकान्यात दिसणारे आकडे आणि अक्षरं जशीच्या तशी तुम्हाला इथं टाकायची आहे.
त्यानंतर Open PDF यावर क्लिक केलं की तुमच्यासमोर तुमच्या गावाची मतदार यादी ओपन होते.
मतदार यादी-2023 असं या यादीचं शीर्षक असतं. इथं सुरुवातीला तुमचं गाव ज्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात येतं त्या मतदारसंघाचं नाव, क्रमांक आणि आरक्षणाची स्थिती दिलेली असते.
पुढे मतदान केंद्राच्या तपशीलात मतदान केंद्राचं नाव, क्रमांक आणि पत्ता दिलेला असतो आणि त्यानंतर मतदारांची संख्या (महिला, पुरुष, तृतीयपंथी) दिलेली असते.
त्यानंतर गावातील मतदारांच्या नावाची यादी दिलेली असेत. यात मतदाराचं नाव, पती किंवा वडिलांचं नाव, घर क्रमांक, वय, लिंग ही माहिती दिलेली असते. अशा पद्धतीनं तुम्ही या यादीत तुमचं नाव शोधू शकता Matadar Yadi.