बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्याच्या आस्थापनेवरील “M15- रु.25500-81100 अधिक अनुज्ञेय भत्ते” या सुधारित वेतन श्रेणीतील ‘कनिष्ठ लघुलेखक (इंग्रजी- नि-मराठी) या संवर्गातील एकूण 226 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in/for prospects/Recruitment / Chief Personal Oficer या संकेतस्थळवर सदरची संपूर्ण जाहिरात, अटी व शर्तीसह प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर जाहिरात दि. 15.08.2023 ते दि. 04.09.2023 या कालावधीकरीता संकेतस्थळावर उपलब्ध राहील. संकेतस्थळावरील जाहिरातीला अनुसरून विहित अहंता व अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छूक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या लिंकवर भेट देऊन, परिपत्रकासोबत जोडलेल्या (HOW TO APPLY) मधील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज ऑनलाईन पध्दतीने विहीत वेळेत सादर करावा. उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अजार्थी प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी. उमेदवारांच्या मार्गदर्शनार्थ सकाळी 09.00 ते सायंकाळी 06.00 यावेळेत कॉलसेंटर भ्रमणध्वनी क्रमांक 1800222366/18001034566 तसेच आय.बी.पी.एस. या संस्थेच्या संकेतस्थळावर ‘IBPS Candidate Grievance Redressal System’ ही लिंक उपलब्ध असेल.
पदाचे नाव :- “कनिष्ठ लघुलेखक (इं-नि-म) (वर्ग-क) ‘
वेतनश्रेणी (सुधारित) :- M15 (Pay Matrix ) रु.25,500/- ते रु.81,100/-
भरावयाच्या रिक्त पदांची संख्या : – 226