BMC Bharti 2023 : मुंबई महानगरपालिकेत ६०० पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक

BMC Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका कॉर्पोरेशनने डेटा एंट्री ऑपरेटरच्या रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मार्च २०२३ आहे. BMC ची अधिकृत वेबसाइट portal.mcgm.gov.in वर जाऊन आपण अर्ज करू शकता तत्पूर्वी उपलब्ध पदे व शैक्षणिक निकषांविषयी जाणून घेऊया..

 • पदाचे नाव – संगणक सहाय्यक
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • वयोमर्यादा – ४५ वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – १३ मार्च २०२३
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ मार्च २०२३

शैक्षणिक निकष BMC Bharti 2023

 • उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
 • उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा १०० गुणांची प्रश्नपत्रिका असलेली मराठी विषय ( उच्चस्तर / निम्नस्तर) घेऊन उत्तीर्ण असावा.
 • उमेदवाराने MS-CIT अभ्यासक्रम शासन मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून पूर्ण केलेला असावा व याबाबतचे महाराष्ट्र राज्य शासनाचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे.
 • उमेदवाराने मराठी ३० (शब्द प्रति मिनिट) व इंग्रजी ४० (शब्द प्रति मिनिट) या वेगाने टायपिंग परीक्षा शासन मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून उत्तीर्ण केलेली हवी.
 • डेटा एन्ट्रीचा वेग कमीतकमी ८००० की डीप्रेशन्स इतका असावा.
 • एम.एस. वर्ड, एक्सेल व मुलभूत संगणक प्रणालींची माहिती हवी
 • बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोविड-19 कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या / शासनाच्या रुग्णालय / कोविड केअर सेंटर मध्ये किमान ६ माहिने काम केलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.

 

पगाराचे तपशील – संगणक सहाय्यक १८,००० प्रति महिना

उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. पोस्टाने पाठवलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही

 

👉 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈

Leave a Comment